प्रिय बंधूनो,
शिरवळ हे माझं आजोळ.त्यामुळे या गावाशी माझं अतुट नातं आहे.गेली १६ वर्षे आमचं कुटुंब या गावात वास्तव्य करत आहे.या कालावधीत मी बरचस अनुभवलं आहे.
शिरवळ या गावाला ऐतिहासिक वलय लाभलं आहे.एक नागरिक म्हणून या गावासाठी काहीतरी वेगळ करावं असं मला नेहमी वाटायचं.या गावाचं पुरातन वैभव हळूहळू लुप्त होत चाललं आहे याची मनात कुठेतरी खंत होती.त्यातचं श्री.वसंत देवधर यांचं ‘शिरवळ-शुभानमंगल’ हे पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. त्यामुळेच मला शिरवळचा खरा इतिहास कळाला.
फोटोग्राफीची आवड आणि संगणकाचं ज्ञान यांची जोड देवून वेबसाइट बनवायचं ठरवलं.काम हातात घेतलं आणि कधी छंदच बनला ते कळलचं नाही.पुस्तके आणि मासिकांतून बरीचसी माहिती मिळत गेली.ही सर्व माहिती एकत्रित केली.जाणत्या लोकांकडून काही माहिती मिळाली.सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्षात ठिकाणाना भेट देवून त्यांची छायाचित्रे काढू लागलो.याप्रसंगी सहकारी मित्रांनी मोलाची मदत केली.या सर्वाचं फलित म्हणजे ही साईट!
या ठिकाणी दिलेल्या माहितीमध्ये जर काही त्रुटी असतील तर वाचकांनी ती मला अवश्य कळवावी.मी त्यांचा आभारी राहीन.आपल्या प्रतिक्रिया मला प्रार्थनीय आहेत.त्याचबरोबर आपण जर कलाप्रेमी असाल,कवी किंवा चित्रकार असाल तर आपली कृती माझ्याकडे पाठवा. ‘संपादकीय’ या सदरात त्यांना योग्य स्थान देण्यात येईल.
शिरवळकरांच्या ऋणातून मुक्त होण शक्यच नाही.म्हणूनच माझ्या प्रेमळ शिरवळवासियांना माझी ही अनमोल भेट. शिरवळच्या पावन भूमीच्या स्मृती आपल्या मनात कायम तेवत ठेवा.
धन्यवाद !